भूमी-पुत्राचे हात
भूमी-पुत्राचे हात
भूमी-पुत्राचे हात
काळ्या आईची आम्ही लेकरे, हात रंगले काळ्या मातीने।
जीवनातला संघर्ष करू आम्ही , एकमेकांच्या साथीने॥
राबेल जर कधी हात एकटा, साथी - सोबती कोणी नसे|
संकटाशी लढण्यास कुठून बळ? आप्तजनही कोणी न पुसे॥
साहाय्य करता एकमेकांना , कार्य भाग झडकरी साधे।
मातीमधुनी उगवील सोने, मनही नाचेल आल्हादे॥
एकीचे हे बळ देतसे हातांना सामर्थ्य नवे।
संकटातही दुष्काळाच्या लढण्यास मनोधैर्य हवे॥
श्रमदेवीचे करुनी पूजन, मातीचा करू तिलक तिला।
एकजूट पाहून आमुची, लाभेल आनंद धरित्रीला॥
आशीर्वचन लाभेल तिचे, मग धनधान्याला काय उणे?।
भाग्य आमचे आमच्या हाती, 'गरीब' आम्हाला कोण म्हणे?॥
