भूक
भूक
कोणाला संपत्तीची,तर कोणाला सत्तेची,
कोणाला कौतुकाची,तर कोणाला निंदा करण्याची,
कोणाला मदतेची, तर कुणाला दगा करन्याची,
लागलेला ह्या भूकेची तहान कशी मिटवायची ?.
कोणाला प्रगतीची,तर कोणाला पाय ओढण्याची,
कुनाला बंधुत्वाची,तर कुणाला भांडण्याची,
कोणाला सम्मानाची,तर कुणाला किर्तीमानाची,
लागलेला ह्या भूकेची तहान कशी मिटवायची?.
कोणाला विचाराची, तर कोणाला अविचाराची,
कोणाला व्देषाची, तर कोणाला ममतेची,
कोणाला संस्काराची, तर कोणाला मानवतेची,
लागलेला ह्या भूकेची तहान कशी मिटवायची?.
कोणाला धर्माची,तर कोणाला धार्मिक कर्मकाण्डाची,
कोनाला निसर्ग संरक्षणाची,तर कुणाला विध्वंसाची,
कोणाला ज्ञानप्रकाशाची, तर कोणाला अशिक्षेतेची,
लागलेला ह्या भूकेची तहान कशी मिटवायची ?.
प्रतेकाची भूक ही आगळी-वेगळी म्हणायंची,
तीची पूर्ती म्हणजेच जीवनाची गुरु किल्ली.
पोटाची भूख म्हणजे नेमकी मानवी जीवणाची,
तीची क्षणिक अल्पपूर्ती म्हणजे हमी जीवणाची.
सामान्य मानवाची भूक फक्त स्वार्थाची व पोटाची,
पण असाधारण मानवाची भूक असते ज्ञानाची.
अल्प अहाराने पोटची भूक मिटवुन जगने शक्य,
बिना पुस्तकाशिवायं भूक मिटवुन जगने अशक्य.
