भूक भाकरीची
भूक भाकरीची
1 min
2.9K
भूक भाकरीची
तुला अन् मला
लागते सकला
दररोज
पोटासाठी वणवण
हातावर घेऊन पोट
दिनरात कष्ट
पोरांबाळासाठी
भाकरी मिळावया
शेतकरी राजा राबतो
उपाशी राहतो
आमच्यासाठी
जगाचा पोशिंदा
भाकरीचा तो धनी
आहे स्वाभिमानी
सर्वदा
अन्न परब्रह्म
वाया नका घालवू
घास वाचवू
भुकेल्यांसाठी
