भटकंती
भटकंती
1 min
672
साधन असो कोणते
गमन करण्याची गरज असे।
भटकंती करी इकडून तिकडे
जीवनाची नित्य बाब असे।।
प्रवास छोटा असो वा मोठा
जवळ असो वा दूरदेशी।
मिळे अपार ज्ञान
अनुभव साचे गाठीशी।।
विभिन्न चालीरिती
अन् वेगळी संस्कृती
मिळे यापासुनी सर्वांना
दुःख अन् आनंदाची अनुभूती।।
भिन्न धर्म अन् विचारांचे
भेटती लोक नानापरी।
वेगवेगळी भाषा अन् बोली
निर्भेळ आनंद खरोखरी।।
पाहुनी अनेक प्रेक्षणीय स्थळे
धार्मिक अन् वारसा संस्कृतीचा
रोजच्या जीवनावर होतसे
परिणाम भटकंतीचा।।
