भ्रष्टाचार
भ्रष्टाचार
1 min
290
खाण्यासाठी रांगा लागल्या, आग लागली पोटात.
पैशाचा पाऊस तो, फिरकत नाही गरिबी गोठ्यात.
बाजार झाला सगळा, समजत नाही काही.
मिळत नाही फुकट काही, पैशाला ही पाणी.
वाढत आहे पोट, तिथे बकासुराच्या थाटाने.
जनतेची तहान फाटे, राजा पितो माठाने.
सगळे करून भागलो, दोष दुसऱ्या माथी.
आंधाऱ्या काळोखात, सगळेच आहेत साथी.
गर्दीतल्या लोकांनीच, माजवला हा हाहाकार.
म्हने तेच थांबवत आहेत, हा भ्रष्टाचार.
