STORYMIRROR

vinod mohabe

Others

3  

vinod mohabe

Others

भृणहत्या

भृणहत्या

1 min
269

नको मारू माय माझी

संसार तरी पाहू देशील का ...

नाही पाजशील स्वतःचा दूध तरी

गाईचं दूध पाजशील का !!१!!


नको मारू माय माझी

जन्मास तरी घालशील का ....

नाही केलीस पालन पोषण तरी

कोण्या खऱ्या माणसाला दान तरी देशील का !!२!!

 

नको मारू पोटातच माय माझी

माझा चेहरा तरी पाहशील का ....

आपल्या उदरात नाही घेतलीस माय माझी तरी

पाळण्यात तरी खेळवशिल का !!३!!

 

नको मारू माय माझी

संसार तरी पाहू देशील का .....

तूपरोटी नाही चारलीस तरी

मिरची भाकर तरी चारशील का !!४!!


नको मारू माय माझी

तुझं आणि पित्याचा चेहरा तरी पाहू देशील का .....

भावाचा हात घेऊन

राखी तरी बांधू देशील का !!५!!

 

नको मारू माय माझी

जन्मास तरी घालशील का .....

बाल हत्या वाजवून

एक तरी पाप करण्यास वाचशील का !!६!!


Rate this content
Log in