भ्रमाचा भोपळा
भ्रमाचा भोपळा
1 min
369
जीवन मिळाले वसुधेवर
माता पित्याच्या पोटी
आजीआजोबांनी सांभाळले
नमन तयांना कोटी कोटी.....
जगी येवून जीवनातील
मोहमाया जाल नाही समजले
सर्वच रचलेले सापळे असतात
हे मोठे झाल्यावर हो उमजले.....
आपण काय करतो,येतो कोठून
अंधारतात सार्याच या जीवनवाटा
स्वार्थ आपला जपण्याला सारेच
करतात या जीवनी आटापिटा....
शाळा, काॅलेज, सारे झाले आता
जगण्याचा अर्थही आहे खूप वेगळा
जसे दिन जाऊ लागतात तेव्हा
फुटतो मनाच्या भ्रमाचा हा भोपळा....
