STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

भ्रम

भ्रम

1 min
196

लिंबू आणि मिरची 

दारी ती लटकती

काळी ती बाहुली

भेदक कशी पाहती


आमावस्येला कोहळा

बांधला लाल फडकी

नजर लागत ती नाही

रस्त्यावर अंडे सडकी


अंगात तो घुमतो

देव ऋषी येतसे

हाल हाल शरीराचे

किती बरे करीतसे


जादूटोणा भानामती

खेळ सारे मनाचे

भ्रम कसे मिटावे

नसलेल्या भुताटकीचे


खेळ असे सारा

कमजोर मनाचा

गाडून तो टाका

खेळ अंधश्रद्धेचा



साहित्याला गुण द्या
लॉग इन