भरारी
भरारी
1 min
186
मला वाटते पतंग होऊन ऊंच ऊंच जावे
वरती जाऊन खालीं मजेत जमिनीवर पहावे
इवल्या इवल्या इमारतीवरून खाली दिसणार
वरती भरारी मारून मी चांदण्यात भिजणार
कधी खाली कधी वरती माझी ही कसरत
खाली जमा होऊन लोक राहतील बघत
इतका वरती जाईन मी होईल माझा बिंदू
तिथून मी पाहीन नद्या गंगा सरस्वती सिंधू
मोठमोठे डोंगर पर्वत ओलांडून मी जाईन
वेगवेगळे देश प्रदेश डोळ्यांनी माझ्या पाहीन
एवढे स्वप्न आहे देवा पूर्ण होईल का
गगन भरारी मारून मला स्वर्ग गवसेल का?
