STORYMIRROR

Mrudula Raje

Others

2  

Mrudula Raje

Others

भरारी

भरारी

1 min
110

आज माझी छोटी चिमणी उडण्यास सज्ज झाली आहे।

माझ्या प्रेमाचे आणि दोन गोड शब्दांचे बळ तिला लाभले आहे॥


खुणावताहेत तिला उंच आकाशातील चंद्र-तारे।

साद घालताहेत सूर्याचे तेजस्वी नजारे॥


मन आहे उत्सुक उंच उंच उडण्यासाठी।

प्रतिभेचे पंख लेऊन नवे जग धुंडण्यासाठी॥


माझ्या प्रेमाचे क्षितीज ओलांडून दूर-दूर जाताना।

अस्मानाचा निळा रंग भरभरून कवेत घेताना॥


साथ नेहमीच लाभेल तिला माझ्या प्रेमाच्या विश्वाची।

एक आश्वासक स्मित आणि दोन प्रेरक शब्दांची॥


खात्री आहे मला घेईल ती उंच भरारी अवकाशात।

खेचून आणेल यश, कीर्ती ; गाजवेल नाव दिगंतात॥


आणि येईल मागे परतून आपल्याच ह्या प्रेमळ घरट्यात।

कारण इथेच तर आहे स्वर्ग तिचा मायपित्यांच्या सहवासात॥


Rate this content
Log in