भरा मनी सुमनांच्या घागरी...
भरा मनी सुमनांच्या घागरी...
1 min
249
गवत हिरवे, पान हिरवे,
हिरव्या पानावर दवबिंदू कसे,
खोल दरी, उंच डोंगर, रानी वनचरे,
फुले पिसारा, मोर नाचरा,
हे गगन निळे निळे...
नदी वाहते, खळखळ,
पाहा दूर ते तळे,
पान हलते, गार वारा,
सळसळ पाणी भरे...
फुले पिवळी, लाल रंगी,
ही पुष्प-लता कोवळी,
ढग जमले आकाशी,
पडतील मोत्याचे सडे...
गायी वळल्या, गोठ्याकडे,
हंबरती वासरे,
पश्चिमेस रवि गेला,
दिशा लाल झाली...
अंधारली रात्र सारी,
निद्रेत जग गेले,
ताजीतवानी पहाट आली,
किलबिल सारी झाली,
भरा मनी सुमनांच्या घागरी...
