STORYMIRROR

Prachi Kulkarni

Others

2  

Prachi Kulkarni

Others

बहर

बहर

1 min
251

मनात पेटती निखारे, श्वासात दाह आहे

उरात दाटती शहारे, स्पर्शात आग आहे.......

ओल्या क्षणांचे सोहळे, मन वाऱ्यावरी मोकळे

मोरपीस कोवळे, तुझ्यासाठी जपलेले आहे......

कंठात सूर भिजलेला , नथीत मोती जडलेला

स्वर वीणेतला , तुझ्यासाठी झंकारला आहे......

स्वप्न चांदण्याचे , बहर यौवनाचे 

वेल मोगऱ्याची , तुझ्यासाठी बहरली आहे......


Rate this content
Log in