भोंदू बाबा
भोंदू बाबा
1 min
289
भोंदू बाबांच्या नांदी
नको रे बाबा लागू
भोंदूंच्या विचारे
नको रे वागू
आयुष्य आपुले
नाकोरे करू पंगू
असती बहूरुपी ढोंगी
बाह्यरूपी दिसती जोगी
मनाचे कपटी-रोगी
परकीयांच्या डल्ली
सुख भोगती
तयांचे आप्तकींचेच
ना रे उद्धार
स्वतःच विचारी
पंडिता भविष्य,
इतरांचे भविष्य
काय वर्तविणारं...?
पिढ्या शिकून-
सवरून पुढे जाती
ढोंग्या-भोग्यांना
का न परखती?
ढोंग्यांच्या चरणाचे
पाणी पिती
वाह रे ,
शिकल्या
माणसाच्या रीती...!!!
एक दोन तीन दावी
प्रयोग विज्ञानी
बळी पडती
संज्ञानी-अज्ञानी
चमत्काराचे
कारणे जाणुनी
समजून उमजूनी
रोखा,
अमूल्य आयुष्याची
धुळधानी...!!!
