MAHENDRA SONEWANE

Others


3  

MAHENDRA SONEWANE

Others


भोंडला

भोंडला

1 min 170 1 min 170

स्त्रियांचा हा उत्सव, 

परंपरा पाळतात। 

नाव भोंडला याचे, 

समूह नृत्य करतात॥ 


मुलींना आवडणारा सण, 

येतो अश्विन महिन्यात। 

हस्त नक्षत्राला याची, 

होते सजून सुरुवात॥ 


नवरात्रीचे नऊ दिवस, 

दसऱ्यालाही खेळतात। 

पाटावर हत्ती काढून, 

त्याची पूजा करतात॥ 


हत्तीची प्रतिमा ठेवून, 

मुली फेर धरतात। 

शाळेतल्या मुलीसुद्धा, 

गाणी पारंपरिक म्हणतात॥ 


धान्याचे हत्ती काढून, 

ठिपक्यांनी झूल काढतात। 

रंगबिरंगी फुलमाळांनी, 

घालून त्याला सजवितात॥ 


Rate this content
Log in