STORYMIRROR

vanita shinde

Others

3  

vanita shinde

Others

भोळा शंभो (अभंग)

भोळा शंभो (अभंग)

1 min
481

भोळा शिव शंभो

पावतो भक्ताला

धावून हाकेला

येतो सदा//१//


कैलासात त्याचा 

आहे रे निवास

मनी माझ्या ध्यास

दर्शनाचा//२//


बारा ज्योतिर्लिंगे

मंदिर शिवाचे

विविध नावाचे

देवस्थान//३//


महादेव आहे

पार्वतीचा पती

पुत्र गणपती

नि कार्तिक//४//


महादेवा शिरी

गंगा जटेमध्ये

नाग गळ्यामध्ये

शोभे छान//५//


करुनी प्राशन

विषाचा तो प्याला

नीलकंठ झाला

शंकर हा//६//


उघडतो जेव्हा

तिसरा तो डोळा

हालतो सगळा

भूतल हा//७//


दैत्यांचा तो देव

नंदी हे वाहन

प्रथम पूजन

नंदीचेच//८//


आवडते त्याला

बेलाचेच पान

दुधाने न्हाऊन

अभिषेक//९//


Rate this content
Log in