भोगी
भोगी
दाही दिशा बेधुंद वारे
भोगी आली रे मम अंगणी
संक्रमणाची होता नांदी
आनंदच आज जाहला मनी।
पवन मधुर अन् प्रसन्न वाटे
सुरेख सृष्टी भासे नभांगणी,
हळूहळू मग जाईल थंडी
माडांच्या रांगा आहेत अंगणी...
मकरवृत्त जाई लंघून रवी येई अन्
कर्कही येई खुशित पाहत राही
तिळतिळ गारवा सरताना हो
सुखद उष्ण वारे विरारता पाही....
चला वाटूया सर्वांना आनंद
तिळागुळाची उष्ण जोडी,
छान स्नेह वाढवित आहे
माणसा माणसातील ही गोडी....
बाजरीपिठाला तीळ लावूया
लोणी लावूनी बनवुया भाकर,
मिक्स भाजी एकत्र करुनी
भाजी बनवुया अतीरुचकर.....
सदासुहासिनी मनप्रसन्न भगिनी
अंतरातूनी दिसे प्रिया लाजरी
सण वर्षाचा नियमित येता
उमटतात हास्याच्या लहरी.....
