भन्नाट रानवारा
भन्नाट रानवारा
1 min
267
भन्नाट रानवारा
फुलवितो कळ्यांना
कळ्या साद घाली
आपल्या मित्रांना...
माळरानावर डुले
वृक्षलताही खेळती
पक्षी पंख पसरून
आसमंतात विहरती.....
मेघ झाले हे काळेभोर
मेघांची पण घाई झाली
पावसाची लक्षणे बाई
आभाळात दिसू लागली.....
रस्त्यावील सारा कचरा
वर वर हा जावू लागला
भन्नाट रानवारा झोकात
पदपथी ऐटीत चालला......
वसुंधरेने भन्नाट वार्याला
आपल्या कवेत कवटाळले
सारा आसमंत शांत जाहला
पोर खेळाया घराबाहेर पडले.....
