STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

भक्तीला पाव

भक्तीला पाव

1 min
259

नमो श्री गणेशा / आलो परमेशा  

धरूनिया आशा / दर्शनाची ।।१।।


डोळे तरसले / तुझ्या दर्शनाशी

उभा पायरीशी / दास तुझा।।२।।


पुंडलिका साठी / युगे अठ्ठावीस

उभा राहिलास / वीटेवरी ।।३।।


जनाबाई साठी / शेणही थापले

जातेही ओढले / सखूसाठी ।।४।।


संत चोख्यासंगे / ढोरे ओढीयले

वस्त्र पुरविले / द्रौपदीशी ।।५।।


उभा जगजेठी / पांडवांच्या पाठी

त्रास भक्तांसाठी / साहोनिया ।।६।।


सोडिले सत्वरी / वैकुंठ केशवा

गजेन्द्राचा धावा / ऐकूनिया।।७।।


मनी भोळा भाव / हाक देता धाव

भक्ताला तू पाव / पांडुरंगा ।।८।।


मुखी गोड नाम / हाती तुझे काम

हेच तीर्थ धाम / 'पंडिता'चे ।।९।।


Rate this content
Log in