भक्ती
भक्ती
1 min
246
का जावू मी पंढरपुर
माझा आत्मा हा विठ्ठल
काळी माती माझी आई
जगण्याची उमेद ती देई
कष्टा मधे परमेश्वर
का जावू मी पंढरपुर
नाड मोट धरुन हाती
तुझा अभंग रे मुखी
पाट मधे झुलझुल नीर
का जावू मी पंढरपुर
पिकवू शिवार भक्ती रसाचा
खेळ चाले वैष्णव जनाचा
पिकाला सन्ता चा भारg
का जावू मी पंढरपुर
विठ्ठल रखुमा पुंडलिक
नांद ती माझ्या शिवार
नित्य त्यांचा येथे वावर
का जावू मी पंढरपुर
