भक्ष
भक्ष
1 min
448
भिंतीवर आपले
चारही पाय घट्ट रोवून
एखाद्या स्थितप्रज्ञा सारखी
बसते वाट पाहत
आपल्या भक्षाची
शेपूट हलवून
काहिशी....
माणसाचही असच काहिसं
तोही असतो बऱ्याचदा
दबा धरून
आपल्या भक्षावर
पण दोघात
खूप फरक आहे
पाल बिचारी पोटासाठी
असं करते आणि माणूस
तो मात्र ....
पोट भरल्यावरही
प्रयत्नात असतो
नविन भक्ष
जाळ्यात ओढण्याच्या ..
