बहिणीची माया
बहिणीची माया
1 min
371
आईसारखे असते तिचे प्रेम
आईसारखीच तिची माया
आईनंतर असते बहिणीची
आपल्या भावावर छत्रछाया
जरी चालू असेल सदा खोडी
भावाची करते ती लाडीगोडी
प्रेमाचे बंधन कधीही ना तोडी
बहीण-भावाची ही अतूट जोडी
किती वेदना होत असतील त्याला
ती लग्न होऊन सासरी जाताना
बहीण पाहते भावाच्या डोळ्यात
अश्रूचा महापूर वाहतांना
तिला नको असते धन दौलत
नको असते गाडी नि बंगला
इच्छा एकच जीवनात मिळावं
प्रेमाने पाहणारा भाऊ चांगला
