बहिणीची माया
बहिणीची माया




आईची माया तिची सावली
तिच्यानंतर भावासाठी
तूच वेळोवेळी धावली
बहिणीची माया निराळी
भावासाठी जीव ओवाळी
त्याच्या सुखासाठी
नाही पर्वा जगाची
रक्ताची नाती आपली
तुने कर्तव्याने जपली
सासरी असली तरी
माहेरची हितचिंती
दूर असली तरी
माया नाही आटत
बहीण-भावाचं नातं
कधीच नाही तुटत
पाठवला जरी मला
एक रेशमी धागा
हातात बांधून वाटला
मला तो सोन्यासारखा
आठवणी तुझ्या
अश्रू माझ्या नयनी येतात
रक्षाबंधनाच्या दिवशी
तुम्हीच मला आठवतात