भिकाऱ्याचं पोर
भिकाऱ्याचं पोर
1 min
204
पंगतीत बसले दगडाचे देव,
दगडाच्या देवाला खाऊ जरा ठेव,
बसल्याजागी मिळतो तुला नैवेद्य तुपाशी,
माणसाच्या बाजारात मी मात्र उपाशी,
तोंड तुझे दिसत नाही खाणार कसा तू,
खाणार नसशील तू तर घेऊ का जरा,
तू देव नाहीस असं म्हणता येणार नाही,
उष्ट तुझं नेतो खुश होईल माझी ताई,
मागत नाहीस, रडत नाहीस तरी मिळते तुला,
भिकाऱ्याचं पोर म्हणून चिडवतात मला,
तुला जे कळतं ते माणसाला कळत नाही
माणसातल्या माणसाला माणुसकी मिळत नाही
