बहीण - भाऊ
बहीण - भाऊ
1 min
393
तुझ्या मायेची सावली
कायम राहू देे भाऊ
काळ कितीही बदलला
तरी तु दूर नकोस जाऊ
आठवतात का तुुला
लहानपणीच्या गमती-जमती
खाऊसाठी भांंडायचो
पण रहायचो एकमेेेका संगती
आता आपापल्या संसारात
फार होऊन गेलो व्यस्त
पण बहीण- भावाच्या नात्याचा
होत नसतो कधीच अस्त.!!!!!.
