भीमसूर्य
भीमसूर्य
भीमसूर्याच्या तेजस्वी प्रकाशाने
आम्ही प्रकाशमान झालो
भीमसूर्याच्या उदयाने आम्ही
निळ्या गगनात भरारी घेऊ लागलो
तहानलेलो होतो आम्ही
चवदार तळ्याच्या पाण्यासाठी
अन्यायाच्या जोखडात बांधलेलो होतो
भीमसूर्याच्या उदयाने आम्ही
जीवनाचे शिल्पकार झालो
गुलामीच्या विळख्यात आम्ही भटकत होतो
मनुस्मृतीच्या रिंगणात आम्ही
विनाकारण जळत होतो
भीमसूर्याच्या उदयाने आम्ही
समतेचे पुजारी झालो
क्रांतीचा सूर्य पाहण्यास
आम्ही वाट पाहण्यास बसलो
बीज पेरण्या समतेच
धम्म शोधाया लागलो
भीमसूर्याच्या उदयाने आम्ही
बुद्ध धम्माचे अनुयायी झालो
