STORYMIRROR

Raakesh More

Others

4  

Raakesh More

Others

भीमाची लेखणी

भीमाची लेखणी

1 min
643

अथांग सागर ज्ञानाचा

विद्येचा मेरुमणी

धन्य ती भीमाची लेखणी ||0||


फुंकर देऊन ठिणगीला

तो मनोमनी वणवा लावी

महती व्यासंगाची त्याच्या

ज्ञानाची किती गावी

शब्द शब्द ज्वलंत निखारे

धगधगती मांडणी

धन्य ती भीमाची लेखणी ||1||


गुंफुनी माळा शब्दांच्या

अन समतेचा शिंपून सडा

जाणीव होई गुलामीची

नयनांच्या पाणवी कडा

आशय आशय साठवावा

नयनांच्या कोंदणी

धन्य ती भीमाची लेखणी ||2||


घेई प्रेरणा कबीर फुलेंची

अफाट त्याचे सामर्थ्य

तथागतांच्या तत्वविण

सारे जीवन असे व्यर्थ

बुद्ध, फुले अन कबीरांच्या

तत्वांना गवसणी

धन्य ती भीमाची लेखणी ||3||


Rate this content
Log in