भीक दयेची ....
भीक दयेची ....
चालत जाताना दिसला मुलगा एक रस्त्यात ....
गबाळ चेहरा किडकिडीत काहीच नव्हते त्याचा शरीरात ....
पाढीवर होते खूप ओझे ....
त्याच्या जीवापेक्षा जरा मोठे ...
विचारलं तर म्हणाला ...
करतो मी काम त्याच्येच आण्याला गेलो होतो सामान ....
शाळेत का नाही जात???? ...हयावर त्याचे उत्तर मिळाले ...
कोण दररोज माझी भूक भागवेल जर गेलो मी शाळेत ... ...
आई बाबा नाही का तुला ????....
त्याचे उत्तर मिळाले लगेच मला ..
बाप आहे दारूच्या आहारी ...
आई बिचारी करते लोकांची धुनी भाडी ...
दादा माझा आहे हुशार पण पोटासाठी करतो गाडी धुण्याचे काम ..
ताई लहान मुलांना सांभाळते आपल्या लग्नाच्या हुंडयासाठी आता पासून करते ती जपणुकीचे काम ....
इन मिन तीन आम्ही कमवतो ....
त्यातच आम्ही आमचा गरीबाचा संसार चालवतो ....
मला हि वाटते शाळेत जावे बरे कपडे घालावेत चॉकलेट खावीत ....
पण आमच्या नशिबी चॉकलेटे नाही शाळा नाही वापरलेल्या कपडयांनी दिवस काढायला हवेत आम्ही ....
गरीब श्रीमंतीचा फरक जाणवतो तेव्हा ताई ..
राहतो मी च्या ठिकाणी कचरायच साम्राज आहे चारीबाजूनि ....
तुम्हा लोकांना तिथे जाण्यासाठी हि वीट येईल ...
पण आमचं आयुष्य तिथे घालवतो आम्ही ...
सांगता सांगता त्याचे डोळे पाणावले ...
माझ्या मनाला कुठे ते जाणवले ....
एवढयाश्या वयात त्याला जाणीव आहे त्याला त्याच्या परिस्थीची ....
मनी आले कुढे गिरवले असले त्यांनी एवढे धडे संमजसपनाचे ...
मनाला कुठे तरी वाईट वाटले मनी ठरवले करावी त्याला मदद ..
बॅगमधून काढले त्याला देण्यासाठी पैशे ...
पैशे बघून तो म्हणू लागला असे ....
नको मला भीक दयेची ....
आहे आम्हाला उम्मेद अभिमानाने जगण्याची .....
