भगवंत
भगवंत


तोच सूर्य तळपत आहे, तीच रात्र सोबतीला.
ओढ पहाटेची दिवसाला, विलक्षण शांतता मावळतिला.
कोनी नव्हे तो समर्थ, चक्र थांबवन्या काळाचे.
बांधूनी चक्रा सवे आयुष्य, निसर्ग जगतो मुलाचे.
सर्व काही शून्य, अंत सर्वांचा आहे.
जगण्याचा आनंद खरा, जो परमार्थाची चव पाहे.
जिंकला जगला तो खरे, स्वार्थ त्यागुनी सर्व.
देवाला ही हेवा वाटे, मोडून पडला गर्व.
धर्म शांतता पाळावा, करण्या सगळे सशक्त.
माणुसकीचा माणूस आहे, इथे मोठा भक्त.
जबाबदारी सामंजस्य कर्तव्य, या उपरि काही नाही.
आयुष्य आधीच खूप सुंदर आहे, उघड्या डोळ्या भगवंत पाही.