भगवान बुद्ध...
भगवान बुद्ध...
...नाकारले राजपुत्र असूनपण युद्ध
तो होता तथागत गौतम बुद्ध...
..ज्यांनी दिला शांततेचा उपदेश
ज्ञानप्राप्तीसाठी सोडलं महालसुख
नी घातला भिक्षुकाचा वेश....
...आधी तर विशिष्ट लोकांची चालायचा हुकुम
का म्हणुन स्त्रीने सती जावे जर वारला नवरा
ज्यासाठी लावायची ती कपाळी कुमकुम....
...सरसकट व्हायचा मग वंचितांवर अन्याय
मागावा तरी कुठं नक्कि त्यांनी न्याय.....
..माणसांना जातीवर केलं जायचं वेगळ
फक्त जातीवरुन ओळखी व्हायचं सगळं.....
...पण बुध्दा तु मिटवलास माणसामाणसातील भेद
देवुन कर्मठ विचारसरणीला आधुनिकतेचा छेद...
