भग्नशिल्प
भग्नशिल्प
1 min
513
असावा भग्नशिल्पात
गंध शिल्पींच्या हातांचा
असावा त्या हातात
बंध या युगाचा
नाही कोठे शिल्पात
नाव त्याने कोरले
नसावा त्या शिल्पीला
दंभ आपल्या कलेच्या
नसावी त्या शिल्पीत
कठोरता पाषाणाची
म्हणूनच जिवंत होते
छटा सार्या जगण्याची
उभे कातीव ते शिल्प
होऊन आज भग्न
गेले कोठे ते शिल्पी
ठेवून आपले हात.
