भगदाड
भगदाड
शब्दांच्याच सुबक गुलदस्त्यात
शब्दसुमने सुरेख रचू लागले
शब्दांगणात आता चारोळी अन
कवितांचे मयूर अंगणी नाचले...
शब्दाक्षराने कविता छान सजल्या
मायेनं शब्दउद्यानी फिरू लागल्या
जीवनातील या अनमोल देणग्या
मनाच्या गाभार्यात उंचावून गेल्या...
उर्वरीत जीवनवाटेवर आता
शब्दांशीच करायची आता दंगामस्ती
अक्षरमालेत सारी गुंफून घ्यायची
शब्दउद्यानातील फुलांशी करायची दोस्ती...
मनमोहक जीवनाची सारी स्वप्ने
सत्यात उतरावयाची आहेत आता
प्रामाणिक प्रयत्नात सातत्य ठेवायचे
अजिबात मारत नाही हो बाता...
भगदाड नाही पडू देणार प्रयत्नाला
कसोशीनं प्रयत्नात जीवाचं रान करीन
पण एक दिवस नक्कीच सर्वांच्या मनात
एक अढळ स्थान मिळवीन...
