भेटू या
भेटू या
1 min
386
प्रिये भेटू या की परत !!!
ते ओळखीचे आडोशे
थोडे सुधारले जरी
काही खुणा आपल्या, ताज्या करायला
प्रिये भेटू या की परत !
वसंतांच्या काहिलीतला तू
माझा फुललेला जणू गुलमोहर
मिठी नकळत घट्ट होता झाला की कहर
ते मिलन पुन्हा वसंतायला
प्रिये भेटू या की परत !
ती थंडी आपल्या मोसमात होती
म्हणून वाटली गुलाबी
ती नशा डोळ्यातली, म्हणून होती शराबी
त्या नशेत बुडून जायला
प्रिये भेटू या की परत!
ते ढग अंधारलेले, तो पाऊस मुसळधार
तुझ्या अंगाअंगात शिरली सरींची धार
थरथरते ओठ तुझे भर पावसात चुंबायला
प्रिये भेटू या की परत!
