भेटीची आस
भेटीची आस
1 min
11
आस आहे मज तुला भेटण्याची
वारी पंढरीची वारकऱ्या!!१!!
नाचत पंढरी येईन मी ख़ुशी
नको रडकुशी आणू मज!!२!!
देता आलिंगन होई तों आनंद
कीर्तनात दंग होई बारे!!३!!
फुगडी खेळता लोटांगणी जाता
सुखं अवचिता भेटतसे!!४!!
वैष्णवा संगती रामकृष्ण गिती
दुःखं माझे चित्ती पळे तेथे!!५!!
संतदास म्हणे स्वर्गीच्या अमरा
भेटी शारंग्धरा दुर्लभ ते!!६!!
