भेटावा विठ्ठल
भेटावा विठ्ठल
मन गुंतले गुंतले विठ्ठलाच्या पायी।
दिसे विठ्ठल विठ्ठल मला ठायी ठायी।
तुझ्या चरणांशी देवा, थोडी जागा देई।
कासावीस जीव झाला, भेटण्याची घाई॥
रूप तुझे साठवावे, मनाच्या डोहात।
भाव अंतरीचे व्हावे, प्रसन्न, उदात्त।
नाही तुलना रे तुला, कशाची जगात।
मायबाप विठ्ठलाची, आस ह्या मनात ॥
भावना समर्पणाची , ओढ लावी जीवा।
नको हा दुरावा आता, भेट दे केशवा।
हात तुझा डोईवर , ठेव रे माधवा।
तुझा सहवास मला, निरंतर हवा॥
भक्तीमार्ग चालताना , भेटे नारायण।
पंढरीच्या वाळवंटी, आनंदाचे क्षण।
अक्षय हे साठवावे, अमृताचे कण।
अवघ्या ह्या आयुष्याचा, व्हावा एक सण॥
