भेट
भेट
1 min
208
व्याकुळले हे मन
मन हे विरहात,
आठवांचे पसारे
पसारे या हृदयात..
होईल कधी भेट
भेट तिची कळेना,
मनातल्या प्रश्नाला
प्रश्नाला उत्तरे ना..
कसे समजावू मी
मी हृदयाला तू सांग,
आसवांचा मनाला
मनाला नाही थांग..
भेट या मनाची घे
घे ना गं तू एकदा,
जन्म वाया जाईल
जाईल अनेकदा..
