STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

भेट सुखाची

भेट सुखाची

1 min
136

   निरपेक्षतेच लेण लेवूनी

     निसंगतेची वस्त्रे ओढूनी,

     एकदा सुख- दुःखा च्या 

     गावी तू जाऊन तर बघ ।।


     अपेक्षांचा भंग झाल्यावर

     दुःखी- कष्टी होण्या पेक्षा,

     विवेक-जडीत तराजू वर

     तू तयांना तोलून तर बघ ।।


     अपेक्षा नि अपेक्षित वस्तू

     या मधील अंतर हेच खरं

     सुख -दुःखाच माप असत

     एकदा ते मोजून तर बघ ।।


     ते कमी तर सुख जास्त

     नि जास्त असेल तर मग

     असंतुष्टतेच दुःखच जास्त

     ते अंतर कमी करून बघ ।।


     सुखी राहाण्याची प्रवृत्ती 

     म्हणजे नसे अल्पसंतुष्टता,

     मिळालं तेच ठीक म्हणून

     नको जीवनात उदासीनता।।


     जे- जे बदलता येईल त्यास

     बदलण्याची वाढव क्षमता,

     अन् जे बदलता येणार नाही

     तया बद्दल नको रे ! निराशा, चिंता ।।


     नकोच ती गुलामी अपेक्षांची

     मजुरास वाटे जशी ओझ्याची,

     दुसऱ्या कडून करण्यापेक्षा

      अपेक्षा तू स्वतःकडूनच कर,

      भेट सुखाची होईल नक्कीच 

      हीच गोष्ट खास ध्यानात धर ।।

              


Rate this content
Log in