भेगाळली मने
भेगाळली मने
कोरोना काळात मानव लागला मरायला
देवू शकत नाही मदत मानवच मानवाला...
हैराण झाला जीव या कोरोना विषाणूने
माणूसकी हरवली नातेवाईकामधे माणसाने....
उभे ठाकले कोरोना योद्धे आता सामोरी
विषाणूची लागण होतेय जणूकाही आहे हाकामारी....
माया ममता सारे काही संपल्यासारखे वाटते
काय करणार आपलाही जीव कोण धोक्यात घालते....
शासनाने केलेय लाॅकडाऊन जरी आता
घरोघरी राबतेय मुलाबाळांसाठी माता...
डाॅक्टर,पोलीस पार दमून थकून गेले
उपचार करण्यात सारे खरचच मग्न झाले...
माणूस माणूसकी सोडून वागतोय खरा
भेगाळली मने सार्यांचा आटला प्रीतीचा झरा....
विसरूया कोरोनाला जरा ,माणूसकीचे रंग उधळू या
प्रेमाचे चार शब्द बोलून त्यांचे सात्वंन तरी करू या...
आपल्या नात्यामधे प्रेमाचा सांकव बांधू या
व्हिडिओ द्वारे नातेवाईकांशी संपर्क ठेवू या...
राग,लोभ,द्वेष,मत्सर सारे विसरून जावू या
माणसाने माणसाशी माणसासम खरेच वागू या...
