भावनेचा शब्द
भावनेचा शब्द
शब्द शब्द बोलता कळी तयाची वृत्ती
साठवलेल्या मनी भावनांना मिळेेेल त्यास मुक्ती .
मनी शब्द दबता भीती फार वाढे
विचारात गुंग होऊनी लक्ष वेधते सारे.
कठोरतेचा शब्द क्षण क्षण आठवी
मनी जगाचा भाव तो क्षणात शिकवी.
क्षणभराच्या मजेत नको जाऊ तू व्यर्थ वाया
माता पितासह इज्जतीवर पलटेल काया.
अंधारलेल्या जीवनात दिवा होऊनी जळ तू
क्षण कार्यविन न घालविता पुढे हात कर तू.
शब्दा शब्दाच्या जाळ्यात होईल जेव्हा त्रास
समझ तू त्या दिवशी जीवनपानाचा होईल ऱ्हास.
दुसर्याच्या भावनांशी नको खेळू तू खेळ
सत्य जाणता पस्तावेल नसेल तेव्हा वेळ.
शब्द मांडण्याची पद्धत असते वेगळीच न्यारी
ज्याकडेे ते ज्ञान तो जगावर पडेल भारी.
म्हणून म्हणतात........
शब्द मधाहुनी गोड आणि तलवारीहुन धारदार
शब्द बोलण्यापूर्वी कर तू विचार फार.
