भावना
भावना
1 min
32
मनातला शब्द
ओठावर येतो
चांगले वाईट
सारेच जाणतो....
भावना अंतरीच्या
आल्या शब्दावाटे
शब्दच ते मनीचे
फुटावे भावनेवाटे....
चांगले काही झाल्यास
मनी चांगले वाटते
वाईट काही झाल्यास
ह्रदयी हे धडधडते...
प्रेम अंतरातले हे
सदा बोलून दाखवावे
नाहीतर त्या प्रेमास
लागते की हो मुकावे....
दुःखी भावना मनीच्या
मित्रांना सांगाव्यात
सुखातही मित्रांना
पार्ट्या छान द्याव्यात....