भाऊराया
भाऊराया
1 min
246
भाऊ माझा पाठीराखा
देतो सुख आणि छाया !!
आई बाबा नंतर
तोच देतो माया!!
भाऊ माझा गुणी
विचार त्याचे थोर!!
खरंच आहे मी
त्या घरची नाजूक पोर !!
भाऊ आणि बहीन
जन्म घेती आईच्या उदरी !!
भावाचे निर्मळ प्रेम
पडते बहिणीच्या पदरी!!
भावा बहिणीचे प्रेम
प्रेम असते जिव्हाळ्याचे !!
निर्मळ आणि पवित्र
दोघांनी सांभाळायाचे!!
या नात्याला उपमा नाही
अत्यंत सुंदर बंधन !!
बहिण भावाच्या प्रेमाचा
सण रक्षाबंधन!
