॥ भाऊबीजेनिमित्त ॥
॥ भाऊबीजेनिमित्त ॥
बहिण आणि भाऊ अतुट नातं
नकळत मनाच्या बॅंकेत उघडलेले प्रेमाचं खातं
मायेच्या तिजोरीतुन कितीही रक्कम काढली, नाही होत रीतं
निरागस नात्याला नसते भिंत
नको बहिणीला भेट, हवी माया
हिरव्यागार झाडाची घनदाट छाया
चिरतरुण राहो भाऊराया हि आस मनी
मागणं एकच तुला, कर प्रार्थना
सुखी ठेव बहिणीच्या कुंकवाचा धनी
भाऊबीजेला तु घेऊन ये हक्काने
माझ्या सासरी, बांगड्या साडी चोळी
आतुरतेने वाट बघते रे दारात हि बहीण भोळी
तु आला तर आनंद, नाहितर ओलावतात कडा
भक्कम आधार तु, समजुत घालतो जीव वेडा ॥
