॥ भाऊबीज ॥
॥ भाऊबीज ॥
आवरुन सावरुन गॅलरीत होते उभी क्षणभर बघीतले नभी
दिसला एक तुटत असलेला तारा मनी
प्रार्थना केली मिळत राहो माहेरचा वारा
सासरची पडवी आहे खुप मोठी
तरी सय येते जरी माहेरची ओसरी छोटी
भाऊबीजेला बहीण भाऊ भेटणार पर्वणी मोठी
उत्साहाने लावला पणतीचा दिवा
मनी एक हुरहुर, भाऊ यायला हवा
मनाची ती घालमेल, डोळ्यांच्या कडा पाणवतात
क्षणात औक्षण करायची हौस मनात
सासरच्या दारात उभी, वाट पहाते तुझी
भेटायला भाऊराया ये, वेडी माया माझी
बालपणी ओसरीवर बागडलो, आजही मनी होतो हर्ष
पाठीवर मायेचा हात असावा, आशीर्वादाचा लाखमोलाचा स्पर्श ॥
