भाऊबीज
भाऊबीज
1 min
275
भाऊबीजेच्या सणाला
बहिण ओवाळी भाऊराया
बहिण भावाचं पवित्र नातं
एकमेकांवर अपार माया
भाऊबीजेच्या सणाला
औक्षणाचं सजतं ताट
गोडधोड सुग्रास भोजन
रांगोळीनं सजतो पाट
मोठ्या ताईचा लाडोबा
लहानगीचा पाठीराखा
दादागिरी दाखविणारा
बालपणीचा कुटूंबसखा
बापानंतर जबाबदारी
स्वीकारतो हाच भाऊ
बहिणीसाठी ह्रदय त्याचे
लोण्याहून असते मऊ
जीवापाडं जपते नातं
भावांची लाडाची ताई
बहिणीच्या रुपात लाभते
आईनंतरची एक आई
बहिण भावाचं जपते नातं
आमची हिंदू संस्कृती महान
बहिण ओवाळते भाऊराया
भाऊ देई ओवाळणी छान!!!
