भाऊ माझा
भाऊ माझा
1 min
273
भाऊ माझा पहा पाठीराखा मज भासे जणू देवा सारखा
भाऊ माझा आहे जिवलगा घरातल्या सर्वांचा तो सखा
भाऊ माझा माय माऊली घरावर त्याचीच सावली
भाऊ माझा मायेचा गोळा राहतो शंकरावाणी भोळा
भाऊ माझा मनमिळाऊ देतो सर्वाना समान खाऊ
भाऊ माझा सर्वात वेगळा पिकवितो प्रेमाचा मळा
भाऊ माझा वाचन वेडा जणू पुस्तकातला किडा
भाऊ माझा खूप इमानदार खोट्या गोष्टीला तडीपार
भाऊ माझा हा आवडता संपणार नाही त्याची कथा
