STORYMIRROR

Pradnya Sonali Dhamal

Others

4  

Pradnya Sonali Dhamal

Others

भातुकली

भातुकली

1 min
988

माझी गोंडस परी खेळत होती घेऊन बाहुली

बघत होते मी हरपून खेळ मांडला तिने भातुकली

रोज बघून घरात आईला किती पद्धतशीर भांडी मांडली

एका क्षणात मनात आले स्त्री जन्माला येऊन ही तर चुकली

डोळ्यात किती तेज तिच्या मैत्रिणी पण होत्या खेळात

दंग इतका छान भातुकलीचा रंग भीती वाटते कोणी करू नये भंग

साऱ्या घरभर तिचे खेळणे तिच्या खेळात माझे रंगणे

चिमुरडीचे गोड हसणे किती अवघड तिला जपणे

दिवस असेच आनंदात माझे हळू हळू परी मोठी होऊ लागली

माझ्या मनात भीती ची पाल चुकचुकली

तिच्या रक्षणाची चाहूल लागली खरंच का ती स्त्री जन्म घेऊन चुकली

लहानच बरी होती हवं तसे बागडत होती स्वरक्षणाचे धडे तिला देत होते

तरीही काळजीने भीत होते समाजाचा कायदा काही केल्या बदलत नाही

नराधमांची नशा उतरत नाही शेवटी दोष तिच्यावरच येतो मन म्हणते देवा कशाला हा स्त्री जन्म देतो



Rate this content
Log in