भातुकली प्रत्येकीच्याआयुष्यातील
भातुकली प्रत्येकीच्याआयुष्यातील
लहानपणी ती आणि सर्व मैत्रिणी
खेळतात आनंदाची भातुकली
मांडतात छोटी भांडी, झाडु आणि मातीच्या चुली.
सुंदर जरी कापडाने सजवते ती तिची मोत्याची बाहुली
जणु आहे ती तिचीच सावली.
हळूहळू ती मोठी होते सुटत जाते
हातातुन तिच्या बाहुली.
आणि आता ती मांडते संसाराची खरीखुरी भातुकली
नेसुन शालु ईरकली चालते ती सप्तपावली
सारेच म्हणतात राजाराणीची जोडी सुंदर जमली
उडुन जाते नव्याची नवलाई आणि खऱ्या अर्थी
सुरू होते मग आयुष्याची भातुकली
अनेक नात्यांची ,आव्हानांची ,परिक्षेची
कधी सन्मान तर कधी अपमानाची.
पण समोर येणाऱ्या प्रत्येक चित्रात
वेगवेगळे रंग भरुन
सुंदर आणि आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करत
असते ती आपल्या संसाराची भातुकली.
अगदी श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत!!!
