STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Others

3  

Dattatraygir Gosavi

Others

भातकं

भातकं

1 min
179

रेवडी घे; गं, लाह्या घे

बाळास माझ्या खाऊ घे

बत्तासे घे; गं, फुटाणे घे

लाडू बाईस भातकं घे।।धृ।।


लेक माझी लय गुणाची

विहीरीस झरा सुधनाची

पाटी घे; गं, लेखन घे 

दौत पेन पेन्सिल घे।।१।।


लेक माझा लय गुणाचा

जणु खोबरं तीळ गुळाचा

शेव घे; गं, चिवडा घे

पिवळा केसरी पेढा घे।।२।।


लेक माझी लय लाडाची

साखर तुप साय दुधाची

फ्राॅक घे; गं, पेटी कोट घे

नवा नवा शाळेचा ड्रेस घे।।३।।


लेक माझा लय गोडाचा

ऊस जणू पाड आंब्याचा

फुलपॅन्ट घे; गं, शर्ट घे

नवा कोरा शाळेचा ड्रेस घे।।४।।


दोन्ही बाळं लयी मायेचे

हृदयी मंदिर देव देवतांचे

गुळ घे; गं, गुळ पट्टी घे

भावेलं तयास ते भातकं घे।।५।।


Rate this content
Log in