STORYMIRROR

Shila Ambhure

Children Stories

2  

Shila Ambhure

Children Stories

भाषिक कोडे

भाषिक कोडे

1 min
483


पौष्टिक आहे

मी एक फळ.

खा रोज मला

मिळवा बळ.


आकार माझा

लांबट जरा

रंग शोभतो

पिवळा खरा.


शुभसूचक ते

खांब माझे छान

पानांना माझ्या

पंक्तीत मान.


कच्चा वा पक्व

उपयोगी फार.

बनवा पदार्थ

खुप चवदार.


मामीचे नि माझे

नाते खुप जुने

गोडवा जास्त

नाही काही उणे.


साल माझी ती

फेकू नका कुठे

घसरून पड़ता

हातपाय तुटे.


जळगावची मी

प्रसिद्ध आहे.

सांगा बरं आता

कोण मी आहे.

~~~~~~~~~~~~

 एक रचना माझी

शीला अम्भुरे बिनगे

     (साद)

  परतुर,जालना


साहित्याला गुण द्या
लॉग इन