भास.....
भास.....
1 min
131
रोजच का असे भास होतात ....
मन माझे धास्ती घेवून बसतो...
तो आल्याचे अन् मला सोबत...
घेवून गेल्याचे...
अंधार होताच घरात...
मनात माझ्या भास घर करत....
मागे कोणी असल्याचा...
नसतो कोणी मागे...
तो असतो केवळ माझा भास...
त्याच्या विचारत केव्हा केव्हा....
मोबाईल वाजत असल्याचा भास होतो....
लगेच मोबाईल कडे धावत मी जाते...
बघून मोबाईल कडे मनाला मी सांगते...
हा मोबाईल चा आवाज नसून मात्र भास तुझा होता....
न कळत या मनाला ....झाले किती तरी भास...
याने केला किती तरी .....माझ्या मनाचा घात...
तो भास केवळ येतो काही क्षणांचा घेवून आनंद...
देवून जातो मात्र पुष्कळ.. क्षणाचा भास....
