भारतमाता आनंदली
भारतमाता आनंदली
छप्पन इंची छातीने तर
भलती केली कमाल
डोळे पुसतो फारुख घेऊन
मेहबूबाचा रुमाल
गळा काढुनी रडू लागला
गुलाम लुच्चा नबी
दुकान मेरी बंद हो गई
हाय क्या करू अभी
ओमर यासीन लोन यांची तर
झाली गोगलगाय
तोंडामधुनी शब्द फुटेना
लटलट करिती पाय
घडेच भरले देशद्रोही अन
फुटीरांच्या पापाचे
कोण तुम्ही रे काश्मीर आमच्या
वाडवडील बापाचे
आज मुखर्जी तृप्त मनाने
चिरनिद्रा घेतील
सावरकर ठाकरे तयांना
टाळीही देतील
अटलनीतीची विजय पताका
स्वर्गाच्याही दारी
शहा नि मोदी जोडी निर्भय
म्हणुनी आम्हा प्यारी
एक एक माणूस देशातील
आहे तुमचा साथी
तोफा सोडा फुटीरांवरती
पेटवून द्या वाती
वंदेमातरम जयघोषाने
दुमदुमले काश्मीर
स्वर्गातून वृष्टी पुष्पांची
करिती शहीद वीर
सार्थक झाले बलिदानाचे
म्हणती जवान स्वर्गी
करूच आडवा आता जो जो
येईल आमच्या मार्गी
भारतमाता आनंदली अन
भरुनी आले डोळे
याचसाठी मी अर्पण केले
किती पोटचे गोळे
काश्मिरातली आज दिवाळी
करी साजरा देश
नजर वाकडी ज्याची त्याला
मुळी न ठेवू शेष
